
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग तालुका सिंदेवाहीच्या (अजितदादा पवार) वतीने सिंदेवाही तालुक्यातील विविध समस्यांच्या मागणीचे निवेदन मा.संदीप पानमंद तहसीलदार सिंदेवाही मार्फतीने मा. ना. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले.
वहाबभाई सैय्यद जेस्ट कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका सिंदेवाही च्या नेतृत्वात तथा सचिन रामटेके तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग तालुका सिंदेवाही च्या उपस्थितीत देण्यात आले. खालील प्रमाणे मागण्याची निवेदन देण्यात आले.
शासन्याच्या निर्णयानुसार सिंदेवाही तालुक्यातील अतिक्रमण धारकांना मालकी हक्काचे पटटे त्वरीत देण्यात यावे.घरकुलाच्या जाचक अटी शिथील करून, ज्यांचे घरकुल झाले आहे व ते जिर्ण अवस्थेत आहेत त्यांची मोका पंचनामे करून राहण्यास योग्य नसलेल्या लाभार्थानां पुनःश्च विविध घरकुल योजनेच्या माध्यमातून योजनेचा लाभ देण्यात यावा.अपंगाना विनाअटी सरसकट घरकुलाचा तात्काळ लाभ देण्यासाठी राखीव कोठा च्या माध्यमातून योजना घरपोच या आधारे घरकुल प्रदान करण्यात यावे.औद्योगीक विकास महामंडळ (एम.आय.डि.सी.) ची खाली असलेली जागेमध्ये उद्योग निर्मीती केल्याने सुशिक्षित बेरोजगार काम करतील व तालुक्यात रोजगार निर्मीती होईल यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी. लिज वर दिलेली जागा उद्योग निर्मीत नसल्याने तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरीक बाहेर पलायन करीत आहेत. करीता उद्योग निर्मीती आवश्यक झालेली आहे.अल्पसंख्याक (मुस्लीम, शिख) समाजातील कुटूंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.
याप्रसंगी सचिन रामटेके तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सेल तालुका सिंदेवाही,वहाबभाई सैय्यद ज्येष्ठ कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका सिंदेवाही, रमेश कावळे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सिंदेवाही, जीवनदास गेडाम,गुलाम हुसैन शेख,विलास नागापुरे,रवि खोब्रागडे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सेल तालुका सिंदेवाही चे पदाधिकारी तथा कार्यकर्ता गण उपस्थित होते.














