
प्रणित तोडे
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
चंद्रपूरची जिवनदायनी इरई नदी पूर्ण बुजली असल्यामुळे खोलीकरणाच्या मागणीला घेऊन अनेक राजकीय पक्ष,संस्था-संघटना,पुरपीडित व चंद्रपूरकर 18 वर्षांपासून झोपेचं सोंग घेतलेल्या शासन-प्रशासनाला जागे करण्यासाठी “गेट वेल सून” म्हणीत 14 फेब्रुवारी ला गुलाब फूल व निवेदन देऊन दाताळा पूल ते हडस्ती पर्यंत खोलीकरणाची मागणी करणार आहे.
चंद्रपूरकरांनी उभारलेलं इरई बचाव जनआंदोलन जलसंपदा दिन 22 मार्च 2006 पासून नदीच्या खोलीकरणाची मागणी सातत्याने करीत आहे.शासन- प्रशासनाने बुजलेल्या नदी कडे दुर्लक्ष केल्यामुळे सन 1986,2006,2013 व आता प्रत्येक वर्षी 2022,2023 व भविष्यातही महापुराची संभावना पाहाता नदीच खोलीकरण व्हायलाच पाहिजे ही भावना प्रत्येक चंद्रपूर व्यक्त करीत आहे.
एकीकडे पावसाळ्यात जनता पुरात बुडते व उन्हाळ्यात पाणी टंचाई ने व्याकुळ होत असतांना विना गरजेचे सुस्थितीत असलेले बसस्टॅण्ड तोडून नविन बसस्टॅन्ड, बगिचे,फव्वारे,सौदंर्यकरणासाठी प्राण्यांचे पुतळे जे देखभाली अभावी सुस्तिथीत राहूच शकत नाहीअसे एक ना अनेक सौन्दर्यकरण भगणावस्थेत गेले तसेंच अनेक भवनाचं बांधकाम,झुलता पूल व त्यावर कोणीही मागणी केली नसतांना 4 कोटीची लाईटिंग,6o% पेक्षा जास्त gst व अन्य अप्रत्यक्ष कर भरणाऱ्या गरीब जनतेला जिल्यात झालेल्या अनेक खर्चिक इव्हेंट मध्ये प्रवेश देण्यात भेदभाव केलेल्या अनेक निरर्थक बाबी वर शेकडो कोटी खर्च केल्याचं टेम्बा मिरविणारे जिल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 9 एप्रिल 2016 रोजी केलेली इरई पुनःरुजीवन व 24 डिसेंबर 2022 ला इरई खोलीकरणाची केलेल्या घोषने कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने जनतेला प्रत्येक वर्षी महापुराचा सामना करावा लागत आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्ष,समाज-सामाजिक संस्था,युवक मंडळे,पुरपीडित,चंद्रपूरकर जनतेने संघटित होऊन इरईची आर-पारची लढाई येत्या 25 फेब्रुवारी पासून मोठ्या आंदोलनाने लढून व जनतेच्या घामाच्या कराच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्यांना येत्या सर्व निवडणुकीत अद्दल घडविण्यासाठी महापूर,पाणी टंचाई सह जनहिताच्या अनेक मुद्यावर लढण्याची तयारी केली आहे. आपल्या या आंदोलनात जनतेने मोठया संख्येने सामिल होण्याचे आव्हान इरई नदी साठी लढणाऱ्या चंद्रपूरकरांनी केले आहे.














