prabodhini news logo
Home घुग्घुस विद्या टॉकीज मागील भंगार दुकान हटवा अन्यथा आंदोलन

विद्या टॉकीज मागील भंगार दुकान हटवा अन्यथा आंदोलन

0
156

शरद मल्हारी पाईकराव अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी घुग्घुस

जास्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

आज दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी घुग्घुस च्यामाध्यमातून मा. कुशाल मेश्राम VBA महाराष्ट्र सदस्य मा. सोमजी गोंडाणे VBA जिल्हाध्यक्ष चंद्रपूर मा. ॲड.अक्षय लोहकरे VBA जिल्हामहासचिव मा. धर्मेंद्र शेंडे VBA तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मा.शरद मल्हारी पाईकराव VBA घुग्घुस शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये मा. मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले की, विद्या टॉकीज मागे (वार्ड नं. 6) प्रभाग क्रमांक 10 घुग्घुस येथील खुप मोठा प्रमाणात भंगार दुकान नझुल जागेवरवरती उभारण्यात आले आहे. व आजुबाजुला पडीत जागेवर सुद्धा या भंगार दुकानदाराने खुप मोठ्या प्रमाणात भंगार ठेवले असुन भविष्यात हे जागेवर सुध्दा हळप किंवा ताब्यात घेण्याचा नाकारता येत नाही. गरीब नागरीकांना गरजुना राहण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी जागा मिळत नाही
तरी ते भंगार दुकान हटवुन गोरगरीब किंवा गरजु लोकांना देण्यात यावी. जर का ही मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. असा इशारा देखील यावेळेस निवेदनातून देण्यात आला. निवेदन सादर करतांना वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक् शरद मल्हारी पाईकराव शहर अध्यक्ष जगदीश मारबते दत्ता वाघमारे योगेश नगराळे महासचिव अशोक भगत कोषाध्यक्ष राकेश पराशिवे संघटक आशिष परेकर आयटी सेल प्रमुख नकुल निमसटकर सदस्य राकेश कातकर पियांशू कोवले सदस्य व समस्त घुग्घुस वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here