सुभाष दरेकर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अहमदनगर
श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे नोंदणीकृत असलेल्या,MAAUS OLD AGE HOME FORUM या वॄध्दाश्रम संस्थेच्या वतीने हिरडगाव येथे भव्य असे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते
शासनाकडे अधिकृत नोंदनी करून आपले गावी गेल्या दोन वर्षांपासून कुठल्याही निधी शिवाय किंवा देणगी शिवाय वैयक्तिक कुवतीनुसार गावातील अठ्ठावीस वृध्दांना महिन्यासाठी लागणारा किराणा व प्रत्येक महिन्याचे औषधोपचार नियमित सुरू आहेत! त्यातील एक पुढचे पाऊल म्हणून गुरूवार दिनांक २२/२/२०२४ रोजी गावात नागनाथ मंदिरात ह्रदयविकाराचे संबंधित तपासणी करण्यासाठी कॅंप घेणेत आला. २५% रूग्ण २५% वृध्दाश्रम संस्था व ५०% डॉक्टरांवर भार टाकून सवलतीच्या दरात ४७ लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या! त्यात आठ लोकांच्या शरीरात बदल आढळून आले! पैकी तीन अँजिओग्राफी करावी लागली पैकी एक एन्जोप्लॅस्टी करावी लागणार आहे! म्हणजे कॅम्पचे फलीत आठ लोकांना दिशा मिळाली! काही डेंजर झोनमध्ये मिळून आले आहेत!
मित्रहो! पुढील कॅंप मध्ये यापेक्षाही कमी दरात तपासणी करून घेऊ! त्याचा लाभ घ्यावा!
घडून गेलेवर तळतळ करणेपेक्षा वेळीच या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन वॄध्दाश्रम संस्था चालकांनी केले.

