कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही येथील जयस्वाल मंगल कार्यालय येथे तालुका स्तरीय योगा प्राणायाम व हवन शिबीरचे मंगळवार 20 फेब्रुवारी 2024ला सायंकाळी आयोजन केले होते. या कार्यक्रमचे तालुका प्रभारी इंद्रायणी सैनी यांचे नेतृत्वात अध्यक्ष मा.शोभा भगिया राज्यप्रभारी महिला पतंजली योगसामिती, नाश्रीन शेख जिल्हा प्रभारी चंद्रपूर, रोकडे मॅडम, लांडगे मॅडम, आशा दूधपचारे संगठन मंत्री चंद्रपूर, रब्बानी मॅडम आणि चमू तसेच योगेंद्र जयस्वाल, माधुरी नीले, वर्षा गायकवाड सहाय्य्क तालुका प्रभारी प्रा. नागालवाडे शेखर कराळे, स्वप्नील अगळे कार्यक्रम स्थळी होते. या सोबतच होम हवन कार्यक्रम प्रसंगी सुनीता वाढई , सुलभा शेलोकर ,नीलिमा सागरे, कोटगले ,कीर्ती बोरकर, स्विटी अगडे,शोभा भिंगेवार ,माधुरी कटकमवार, पित्तुलवार, अर्चना कटकमवार यांचे सह अनेकांनी शिबिरात सहभाग नोंदविले त्यासोबतच शिबिराचे मान्यवरांचे पतंजली योगप्राणायाम महिला सभासदांना कार्यक्रम स्थळी मार्गदर्शन लाभले. प्रभारी इंद्रायणी सैनी यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन सर्वांचे आभार मानले.

