कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सिंदेवाही तालुक्याच्या वतीने जनसेवा सेलिब्रेशन हॉल सिंदेवाही येथे कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन भटारकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर होते. प्रमुख पाहुणे प्रशांतजी झामरे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सेल चंद्रपूर, राकेशजी सोमानी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर, अमर गोमासे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी मीडिया सेल चंद्रपूर, मानव वाघमारे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस स्वयंरोजगार सेल चंद्रपूर, सचिन रामटेके तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सेल तालुका सिंदेवाही, रमेश कावळे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंदेवाही हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते अपंगांना जीवनावश्यक वस्तूची किट वितरण करण्यात आले.
मा.नितीनजी भटारकर, मा. प्रशांत झांबरे, मा.राकेश सोमानी यांच्या नेतृत्वात काही कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक सचिन रामटेके अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सेल तालुका सिंदेवाही यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वहाबभाई सय्यद यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साम्याजीक न्याय विभाग सेल, महिला आघाडी, युवक राष्ट्रवादी तथा सर्व फ्रंटचे पदाधिकारी कार्यकर्ता यांनी अथक परिश्रम केले.

