प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – बाप

0
39

बापा समान जिवंत मूर्ती
या दुनियेत मिळण्यास अवघड
कष्ट सोडूनिया सावली देई
लेकरांना बापचं आधारवड

बाप करतो कबाडकष्ट
त्याच्या लेकरांच्या भविष्यासाठी
ऊन पावसाची त्याला ना खंत
राबतो तो आपल्या मुलांसाठी

हात पकडून चालवतो
दुनियेचा देतो धडा
तोच आहे आपला पाठीराखा
जगात जवळचा हा मित्र खरा

खांद्यावर बसवून मुलांना
दाखवतो पर्यटनाची उंच नगरी
बाबा विना कसे जगावे आज
या काळोख अंधारमय प्रहरी

आठवणींच्या काही दिथल्या
नवीन उज्वल आशा बाबा
आशीर्वाद असावे आम्हा मुलांवर
आपल्या प्रीतीचा गंध क्षणोक्षणी द्यावा

रंजना भैसारे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here