बाबा काय लिहू? त्यांच्याबद्दल
सुचेनाच काही
बाबा माझ्यासाठी स्मरणात राही।।१
अण्णा माझे होते डॉक्टर
दिवसरात्र कष्ट करायचे
घरसंसार सांभाळून
बऱ्याच रोग्यांचे जीव वाचवायचे।।२
कंटाळा हा शब्द नव्हता त्यांच्या शब्दकोशात
सतत काहीतरी करत राहणे आणि समाजसेवा होती त्यांच्या रक्तात।।३
अण्णा, माझे होते माझा हिरो माझा अभिमान
प्रत्येकाच्या मनात मिळवले त्यांनी मानाचे स्थान।।४
रात्री ही कित्येकदा यायचा अचानक कॉल
झोप सोडून जायचे हमखास जीवनदान
रोग्यास द्यायचे ।।५
कित्येकांचे जीव वाचवले कायम राहून कामात
पण नियतीचा अजब खेळ आला नाही लक्षात..।।६
दुर्धर रोगाने ग्रासले त्यांना आणि होत्याचे नव्हते झाले काही दिवसात
खूपच लहान, 53 व्या वर्षी मरण आले
आणि आमच्या आयुष्यातून अण्णा रुपी देवदूताचे आयुष्य संपले।।७
अजूनही आहेत आमच्या आयुष्यात तुम्ही आठवणींच्या रुपात
आज हवे होता अण्णा पहायला, आम्ही सगळे आहोत सुखात…! ।।८
मानसी बापट
बंगलोर

