
घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव,वंचित बहुजन आघाडी
सुविद्या बांबोडे
जिल्हा संपादक
प्रबोधिनी न्युज, चंद्रपुर
घुग्घुस – आज दी. ११ मार्च २०२४ रोजी वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून मा. राजेश बोरकर जिल्हा प्रभारी, मा. प्राध्यापक सोमाजी गोंडाणे जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर मा. ॲड. अक्षय लोहकरे जिल्हामहासचिव, मा. धर्मेंद्र शेंडे तालुका अध्यक्ष, यांच्या मार्गदर्शनाखाली मा.शरद मल्हारी पाईकराव घुग्घुस शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात मा. मुख्याधिकारी नगर परिषद घुग्घुस, यांना निवेदन देण्यात आले,
की घुग्घुस शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखला जातो. पण विकासाच्या बाबतीत अजूनही घुग्घुस शहर हे गावच आहे. याच खूप खंत वाटतो.नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाल्यावर सुध्दा खूप काही गोष्टी आहे. ज्या घुग्गुस शहरात नाही आहे. घुग्घुस ते शेनगाव फाटा हा हायवे मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक ही 24 तास सपाट्याने सुरूच असते. मोठे वाहन सुध्दा बेधडक चालतात. हायवे च्या अधा – मधातून खूप जनावर सुध्दा अनेकदा रस्ता ओलांडतात. पायी चालणारे लोकं सुध्दा रस्ता ओलांडतात. दिवस असता वेळेस ते दिसून पडते. पण रात्र झाल्यावर तिथे काहीच दिसत नसल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक महिन्यात तिथे एक ना एक जनावराचा अपघात होतच राहतो . आणि जास्तीत जास्त हे रात्रीच्या काळोख्यात अपघात होतात. हे माणसाच्या बाबतीत घडाव नाही यासाठी घुग्घुस ते शेनगाव फाट्या पर्यंत रोडवर स्ट्रीट लाईट लावण्यात यावे. यामुळे होणारे अपघातही टळतील. आणि घुग्गुस शहरतील रोड देखील प्रकाशमय होतील.
असी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहराचा वतीने मागणी करण्यात आली.
निवेदन सादर करतांना वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव उपाध्यक्ष जगदीश मारबते दत्ता वाघमारे योगेश नगराळे महासचिव अशोक भगत कोषाध्यक्ष राकेश पराशिवे संघटक आशिष परेकर आयटी सेल प्रमुख नकुल निमसटकर व समस्त घुग्घुस वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.















