prabodhini news logo
Home ठळक बातम्या गुरधाळ येथे हरिनाम सप्ताहात ४० जनांना विषबाधा

गुरधाळ येथे हरिनाम सप्ताहात ४० जनांना विषबाधा

0
57

बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज

तालुक्यातील गुरधाळ, खरबवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच भगर खाल्याने ३० ते ४० जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. गुरधाळ, खरबवाडी येथे दि ५ मार्च २०२४ पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाच्या कार्यक्रमात महिला व पुरुषांनी दि ७ मार्च २०२४ रोजी पंधरवडी एकादशी निमित्त हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात भगर खाल्ल्याने ४० ते ५० लोकांना विषबाधा झाली असून त्यांना तात्काळ देवणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवून देण्यात आले असून २५ ते ३० लोकांवर उपचार सुरू आहेत.
देवणी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. तांबोळी व परिचारिका संभाळे यांनी उपचार करीत आहेत. विषबाधा झालेल्यात गायकवाड हुसेन, लोचना गायकवाड, ज्ञानोबा गायकवाड, पार्वतीबाई कांबळे, भानुबाई कांबळे, कांचन गायकवाड, सुवर्णा गायकवाड, उज्वला गायकवाड, चंद्रकला गायकवाड, अर्चना गायकवाड, सुवर्णा नरंिसंग गायकवाड, वनिता गायकवाड, लक्ष्मीबाई गायकवाड, केराबाई गायकवाड, ज्योतिबा गायकवाड, बळवंत गायकवाड, श्रीनिवास गायकवाड, सविता कांबळे, सगुनाबाई वाघमारे, कालींदाबाई कांबळे, लक्ष्मीबाई सुवर्णकार, शकुंतला कारागीर आदींवर देवणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्या लोकांची प्रकृती ठीक असल्याचे दिसून येत आहे. डॉ.तांबोळी व ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी विषबाधा झालेल्या लोकांवर लक्ष देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here