
प्रणित तोडे
व्यवस्थापक संपादक
प्रबोधिनी न्युज
रामाळा तलावाच्या संवर्धनासासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल रामाळा तलाव संरक्षण समीतिच्या पदाधिका-यांनी राजमाता निवासस्थानी भेट घेत आभार मानले आहे.यावेळी रामाळा तलाव संरक्षण समितीच्या पदाधिका-यांनी रामाळा तलावाच्या संवर्धनाबाबत चर्चा सुद्धा केली. सदर तलाव हा चंद्रपूरच्या सौंदर्यात भर घालणारा आहे. मात्र अनेक नाल्यांचे पाणी तलावत येत असल्याने तलाव दुषित झाला आहे. यावरही उपाययोजना केल्या जाणार आहे. आपण या तलावाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहोत. मंजूर करण्यात आलेल्या 30 कोटी रुपयातून या तलावाला पुनरुज्जीवन मिळणार आहे. असा विश्वासही रामाळा तलाव संरक्षण समीतिच्या सदस्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. सुशील मुंधडा, जुगल सोमानी, सिए. दामोदर सारडा, मनोज जुनोनकर, मुंकुद गांधी, सुधिर बजाज, उमेश चांडक, ओमप्रकाश सारडा, श्याम धोपटे, राजु नागरकर, सोनी, मदन पांडिया, विलास वानखेडे, माखीजा, इंगोले, रमेश बोथरा, श्रीचंद हासानी आदींची उपस्थिती होती.














