prabodhini news logo
Home चंद्रपूर मालडोंगरी येथे सभागृह बांधकाम भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

मालडोंगरी येथे सभागृह बांधकाम भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

0
84

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून १५ लाख रुपयांचा निधी मंजूर

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज

तालुक्यातील मालडोंगरी येथे बौध्द समाजाच्या जागेवर आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सभागृह बांधकामाचे भूमिपूजन दिनांक १४ मार्च २०२४ रोजी संपन्न झाले. ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे यांच्या हस्ते कुदळ मारून व श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून बौध्द समाजाच्या जागेवर सभागृह बांधकामासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.
यावेळी प्रामुख्याने ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिताताई पारधी, राजेश पारधी कोषाध्यक्ष ता.काँ.क. ब्रम्हपुरी, तुळशीदास राऊत सचिव काँ.क. मालडोंगरी, धनश्री सिडाम ग्रा.पं.सदस्या, निलेश पारधी विजयदुत, गीता मेश्राम अध्यक्षा बौध्द समाज मालडोंगरी, पिराबाई शेंडे सचिव बौध्द समाज मालडोंगरी, भजन शेंडे, भीमराव जनबंधू, अंकुश चहांदे, प्रतिभा वंजारी, कविता धोंगडे, मुखरु सिडाम, श्रीकृष्ण बगमारे, बंडू प्रधान, मंगेश पारधी, रुपेश निहाटे, रघुनाथ सोंडवले, भीमराव जनबंधू, धनपाल सिडाम, दादाजी सहारे, संजय पारधी धानोली पोहा चक, मुन्ना लांजेवार, सोमेश्वर झिलपे यांच्यासह ग्रामस्थ व बौध्द बांधव मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here