prabodhini news logo
Home चंद्रपूर सर्वोदय महाविद्यालयात निरोप समारंभ संपन्न

सर्वोदय महाविद्यालयात निरोप समारंभ संपन्न

0
98

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे नुकताच B.A आणि B.Sc प्रथम, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यानी अंतिम वर्षातील विद्यार्थ्या करीता निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमांची सुरवात सरस्वती पूजन करुन झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ मदारे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्याना पुढील होणाऱ्या पेपर आणि भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमांचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डहारे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थांना पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले व महाविद्यालयाचे उन्नतीसाठी योगेंद्रजी जयस्वाल अध्यक्ष विद्या प्रसारक संस्था व श्रि अरविंदजी जयस्वाल सचिव विद्या प्रसारक संस्था सिंदेवाही यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले असे नमूद केले. या कार्यक्रमात प्रा.डॉ.रिजवान, प्रा.उके, प्रा.रणदिवे, प्रा बोरकर, प्रा.गभाने प्रा.आडे, प्रा.मेश्राम, प्रा.राठोर, प्रा बोरकर मॅडम प्रा.अगळे मॅडम, ग्रंथपाल फुलबांदे मॅडम उपस्थित होते.महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.त्यात त्यानी आपल्या महाविद्यालयातील आठ्वणीचा उजाळा देत प्रथम,द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याना प्रोत्साहित केले. तसेच प्रथम,द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. त्यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यानी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदन बावनकर आणि आभार प्रदर्शन लक्ष्मी राऊत यांनी केले.या कार्यक्रमाचे नंतर महाविद्यालयातील विद्यार्थीनी भोजन करुन विविध खेळ खेळले, सामूहिक नृत्य सादर केले तसेच महाविद्यालयाती सर्व प्राध्यापक वृंदाचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here