
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
सिंदेवाही तालुक्यातील नाचनभट्टी येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय नागपूर येथील अखिल भारतीय सन्मवयीत जवस व मोहरी संशोधन प्रकल्प, अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत जवस पीक शेती व भात पीक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. विभागीय कृषी सहसंचालक श्री. तोटावर नागपूर , विद्याताई खोब्रागडे सरपंच ग्रामपंचायत नाचनभट्टी, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र डॉ. नागदेवते सिंदेवाही, डॉ. नायर जवस पैदासकार , मा. डॉ. सवई शास्त्रज्ञ कृषी महाविद्यालय नागपूर,मा.डॉ. राठोड कृषी विस्तार विभाग प्रमुख, मा.डॉ. ठाकरे शास्त्रज्ञ, मा. कामडी, मा. मच्छिंद्र रामटेके अध्यक्ष शास्त्रज्ञ मंच, कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी शेतकऱ्यांना जवस पीक व भातपिकाबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी बांधव, अधिकारी व कर्मचारी बांधव उपस्थित होते.














