
डॉ.नामदेव किरसान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव यांची विशेष उपस्थिती
गडचिरोली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
कुरुड येथे दि. २५/०३/२०२४ रोजी ता. देसाईगंज (वडसा) जि.गडचिरोली येथे श्री. दत्त प्रासादिक नाट्य समाज, पारधी मोहल्ला कुरुड यांच्या वतीने “माहेरची ओटी” नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.नामदेव किरसान साहेब उपस्थित होते.या नाट्यप्रयोग प्रसंगी उपस्थित प्रेक्षकाना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी गडचिरोली यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर वामनरावजी सावसाकडे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मनोहर पाटील पोरेटी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाध्यक्ष पंचायत काँग्रेस कमिटी भैय्याजी मुद्दमवार, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, पंढरीजी कावळे, प्रदेश सचिव ओबीसी काँग्रेस मनोज ढोरे, शरद मेश्राम, माजी उपसभापती अर्चना ढोरे, माजी संचालक विजय उके, शालिकराम पारधी, दीपक भागडकर, वसंता फटिंग गणमान्य मंडळी व मोठ्याने संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.














