
प्रणित नामदेव तोडे
व्यवस्थापक संपादक
प्रबोधिनी न्युज
सकाळी साडेदहा वाजता पटेल हायस्कूल जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य अशा रॅलीच्या द्वारे गांधी चौकातून आंबेडकर चौक ते जटपुरा गेट येथून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य रॅली निघणार आहे. त्यानंतर ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते बालकुंमुद भिरड, ओबीसी समाजाचे नेते गोपाल राऊत व चंद्रपूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्ह्याचे वतीने करण्यात आले आहे.














