जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दाखविला हिरवा झेंडा
उषा नाईक
महिला विदर्भ संपादक
अमरावती
वाशिम- आज २७ मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या मतदान संबंधी जनजागृती कार्यक्रम नगरपरिषद व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या मतदार जनजागृती रॅलीला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस ,मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासूर ,उपजिल्हाधिकारी राजीव जाधव , तहसीलदार निलेश पळसकर,जिल्हा प्रशासनाधिकारी निलेश गायकवाड आदींनी हिरवा झेंडा दाखविला.
यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्स, शालेय विद्यार्थी, नवोदयचे विद्यार्थी, बार असोशिएशन, बचत गटाच्या महिला व नागरिक उपस्थित होते. यावेळी मतदार जनजागृती करण्यात आली.

