प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – तब्बल 20 वर्षांपूर्वी शिक्षण अर्धवट सोडून प्रथम लग्न, घर संसार त्यानंतर आणि शेतात कामगार म्हणून काम केले मंगसा येथील सावित्रीच्या लेकीने जिद्द व कष्टाच्या जोरावर इयत्ता दहावीची परीक्षा देऊन 65.60% चांगल्या गुणांसह घवघवीत यश संपादन केले आहे.बबिता विनोद उईके असे या लेकीचे नाव आहे.
अंबाझरी ता पारशिवणी जिल्हा नागपूर माहेर असलेल्या बबिता यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते. 2004 मध्ये लग्न झाल्यानंतर त्या मंगसा गावच्या सूनबाई झाल्या. लग्नगाठ बांधून मंगसा आल्यावर घरसंसार, दोन मुलींचे शिक्षण व शेतकऱ्याचा शेतात 200 रु रोजी ने काम शेतीचे काम असा दिनक्रम सुरू असताना कुठे तरी मनात आपले शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत वाटत होती.
अखेर तब्बल 20 ते 22 वर्षांच्या खंडानंतर त्यांनी इयत्ता दहावीचा १७ क्रमांकाचा फॉर्म भरून शासनाची योजना नई किरण चा माध्यमातून CRP रत्नमाला बाई यांचा सहकार्यांनी परीक्षा देण्याचा निर्धार केला. शेतीचे कामे घर संसार, दोन मुली यांनी दहावीचा अभ्यास सुरू केला. यात नई किरण एज्युकेशन संस्थेकडून त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन मिळाले, कठीण असलेला इंग्रजी व गणित विषयाकडे अधिक लक्ष दिले आणि अखेर कष्टाला फळ मिळाले. बबिता यांना 65.60 टक्के गुणांनी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.
आठवीत नापास झाल्यावर वयाचा 18 वर्षी लग्न झाल्याने शिक्षण सोडावे लागले. लग्न झाल्यावर खूप वेळा वाटले पुढे शिक्षण घ्यावे; परंतु प्राप्त स्थितीत शक्यच नव्हते. मात्र, परिस्थिती अनुकूल वाटू लागली, तसा दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि जिद्दीने यश मिळवले. आता पुढे बारावीची परीक्षा देणार आहे. असे बबिता विनोद उईके यांनी म्हटले..

