
नितीन पाटील
विशेष तालुका प्रतिनिधी, अमळनेर
मो. 8758428853
जलसंपदा मंत्री मा.ना. गिरीष महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग, भारत सरकार द्वारा मा. खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या सहभागाने भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत सहाय्यक साहित्य साधने मोफत वाटपासाठी वयोवृध्द नागरीकांची मोफत पुर्व तपासणी व नोंदणी शिबीर आज चाळीसगाव येथे संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घाटन ना.गिरीष महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ यांच्यासह भारतीय जनता पक्ष महायुतीचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर शिबिरात चाळीसगाव तालुक्यातील जवळपास ६० वर्षावरील २००० हुन अधिक वयोवृध्द व्यक्तींची व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. पुढील २ महिन्यात पात्र वयोवृध्द व्यक्तींना आवश्यक ते साहित्य वाटप केले जाणार आहे.















