
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा क्षेत्राच्या इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार मा.प्रतिभा बाळू धानोरकर यांच्या प्रचारार्थ मा. भानुदास माळी प्रदेशाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी -ओबीसी विभाग आज 14 एप्रिल रोजी चंद्रपूर शहरात विणकर सभागृह भानपेठ वार्ड चंद्रपूर येथे प्रचार सभा घेऊन मा. प्रतिभा धानोरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले,प्रचार सभेला ओबीसी विभागाचे मा. विजय राऊत विभागीय अध्यक्ष, मा.ऍड गोविंदराव भेंडारकर,मा.नंदकुमार कुंभार, मा. राठोड, मा. हरडे,चंद्रपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदा वैरागडे,प्रदेश सरचिटणीस नंदकिशोर वाढई,प्रदेश सरचिटणीस नरेंद्र बोबडे,प्रदेश उपाध्यक्ष उमाकांत धांडे,ओबीसी काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रशांत दानव,सभेचे आयोजक ओबीसी शहर अध्यक्ष राहुल चौधरी, विमाशी चे अध्यक्ष केशव ठाकरे यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या सभेला काँग्रेस व घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,प्रचार सभेचे संचालन प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनी केले तर आभार नंदकिशोर वाढई यांनी मानले.















