prabodhini news logo
Home गडचिरोली कर्मवीर विद्यालयात डॉ.आंबेडकर जयंती साजरी

कर्मवीर विद्यालयात डॉ.आंबेडकर जयंती साजरी

0
157

गडचिरोली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा (ठाणेगाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनील मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक प्रमोद दिघोरे होते.मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख केला व त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन आणि पुष्पमाला अर्पण करून झाली. यावेळी त्रिशरण पंचशील घेण्यात आले.
कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.नानाजी रामटेके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here