prabodhini news logo
Home चंद्रपूर सिंदेवाही-लोनवाही प्रभाग क्रमांक २ येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती...

सिंदेवाही-लोनवाही प्रभाग क्रमांक २ येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0
181

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

सिंदेवाही- लोनवाही प्रभाग क्रमांक २ येथे दि.१४ एप्रिल २०२४ ला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,बोधीसत्व,भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करुन मालार्पण करण्यात आले.त्यांनन्तर निळी निशानी झेंड्यांचे झेंडावंदन करण्यात आले. मा.आ.विजु वडेट्टीवार ब्रम्हपुरी विधानसभा निर्वाचित क्षेत्र यांच्या प्रेरणेतून तसेच संकल्पनेतून स्व. प्रभूदास वि. नन्नेवार यांच्या स्मृतीपित्यार्थ समस्त बौद्ध बंधू भगीनींसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.त्याचा आस्वाद मोठ्या प्रमाणात सर्वांनी घेतला.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी काँग्रेस शहर अध्यक्ष सुनील ऊट्टलवार, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सिमा सहारे, नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, उपनगराध्यक्ष सुचक, लता गेडाम,नंदा नरसाळे, दिलीप रामटेके नगरसेवक, श्याम छञवानी नगरसेवक, भास्कर नन्नावार नगरसेवक, निताताई रणदिवे नगरसेविका, मिनाक्षी मेश्राम नगरसेविका, वैशाली पुपरेड्डीवार नगरसेविका, अंजु भैसारे नगसेविका, जयश्री कावळे संचालिका कृ.ऊ.बा.समिती, प्रिती सागरे महिला काँग्रेस शहर अध्यक्ष, अभिजित मुप्पीवार तालुका युवक अध्यक्ष सिंदेवाही,महेश मंडलवार, सुनील उईके सर,सर्व पञकार बांधव, नागराज खोब्रागडे, घडसे सर, टेंभुरकर सर, डांगे सर, सुनील जनबंधू, मिनाक्षी बंसोड, निशा अलोने, प्रशांत ढोरे, निशांत भरडकर, प्रविण वानखेडे, रंजित निकुरे, आकाश निकुरे, सर्व काँग्रेस पदाधिकारी गण,स्थानीक नागरीक आणि मला सदा साथ देणारे सर्व सहकारी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here