कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त गिरगांव येथे बौद्ध समाज, रमाबाई महीला मंडळ, रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन गिरगांव तर्फे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी रविवारला भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. महामानवास वंदन करून बौद्ध विहारातून या मिरवणुकीची सुरवात करण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी चौक त्यानंतर झेड.पी. शाळा, त्यानंतर गोटाळी मोहल्यातून परत येत बसस्टँड चौक येथील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण कृष्णदास मेश्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. डी.जे. आणि लेझिम च्या तालावर सर्व ग्रामवासी नाचत या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. शेवटी बुद्ध विहारात सौ. सुकेशनी बारसागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या मिरवणुकीची सांगता करण्यात आले. शेवटी उपस्थित सर्वांना स्वादिष्ट अल्पोहर देण्यात आला. त्यानंतर दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी सोमावारला चिमुकल्या शाळकरी मुलांकरिता सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली. भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना आकर्षित बक्षिसे देऊन संध्याकाळी भोजनाचा कार्यक्रम घेत या दोन दिवसीय कार्यक्रमाचा शांततेत गोड शेवट करण्यात आला.

