prabodhini news logo
Home अमरावती ३७ वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा न्यू हायस्कूल बेलपुरा येथे १९८७ ला दहावीत...

३७ वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा न्यू हायस्कूल बेलपुरा येथे १९८७ ला दहावीत शिकत असलेल्यांचे स्नेहमिलन

0
205

अमरावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

अमरावती :- स्थानिक न्यू हायस्कूल बेलपुरा येथे १९८७ ला दहावीत जे विद्यार्थी शिकत होते त्यापैकी काही दहावीनंतर शिक्षण, नोकरी व कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी गेले व काही जिल्ह्यांतच राहिले परंतु यापैकी काही जणांना आपल्या जुन्या वर्गमित्रांचा ३७वर्षांचा विरह सहन न झाल्याने त्यांनी सर्वांना मोबाईल,वॉट्सॲपच्या माध्यमातून एकत्र आणून सन २०२२ साली आपल्या जुन्या शाळेतच स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले परंतु त्यावेळी सर्वच वर्ग मित्राची भेट न झाल्याने ते व्याकूळ झाले व मग पुन्हा राहिलेल्या इतर मित्रांना मोबाईल व्हाट्सअपच्या माध्यमातून संवाद साधून २७ ऑगस्ट २०२३ रोजी स्थानिक हॉटेल ग्रँड महफील इन येथे दुसऱ्या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी सर्व बालमित्रांनी आपली उपस्थिती दाखविल्याने दरवर्षी असेच स्नेहमिलन आयोजित करण्याचे ठरले त्यानुसार याहीवर्षी स्थानिक हॉटेल विरसा येथे दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी तिसऱ्या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात विशेष कामगिरी असणाऱ्या वर्गमित्रांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला तसेच वैयक्तिक कारणास्तव गैरहजर असलेल्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधून सन्मान व सत्कार करण्यात आला तसेच वाढदिवस असलेल्या मित्रांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.संगीत खुर्ची,फुगडी, उठबशा,दंडबैठक,रींग असे मनोरंजनात्मक खेळ खेळून,व डान्स करून सर्वांनी आनंद व्यक्त केला तसेच गीतांच्या कार्यक्रमात संगीत प्रेमी वर्गमित्रांनी आप आपले आवडते गाणे गायले. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.यावेळी सतीश माहुरे,प्रशांत चेंडके,सुधीर मुकवाने,धीरेंद्र चरपे,प्रवीण गुप्ता, शशी मोदरकर,नितीन देऊळकर, सारंग खोड,उमेश होले,अजय राऊत,संजय गाडबैल,अजय सावरकर,नरेंद्र गावंडे,रवी देशमुख,संजय दिवाण,उमेश दिवाण, अश्विन देशमुख,अशोक कोसे, अविनाश वडतकर,निरंजन पाठक, संजय अंबाडेकर,मनोज नंदेश्वर, सुप्रिया चौधरी,प्रगती पेरसपुरे,अलका जाधव,ज्योती कऱ्हे ईत्यादी वर्गमित्र व मैत्रिणी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here