
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने रत्नापूर नगरी दुमदुमली…!
विविध स्पर्धाचे आयोजन,मिरवणुकीतील लेझीम पथक ठरले जनतेचे आकर्षन
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवचा जयंती उत्सव सोहळा बौद्ध समाज, रमाबाई महीला मंडळ व रिपब्लीकन विद्यार्थी फेडरेशन शाखा रत्नापूर यांचे सयुक्त विद्यमाने मोठ्या थाटात दोन दिवस विविध स्पर्धा कार्यक्रम, उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
दि 13 एप्रील रोजी शालेय विद्यार्थी, महीला यांचे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 14 एप्रील ला सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती पुतळ्यास बौद्ध समाज सचिव रंजीत मेश्राम ,कोषाध्यक्ष राहुल मेश्राम यांचे हस्ते माल्यार्पन व पुजन करुण गावातील मुख्य मार्गने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली.मिरवणुकीत सर्व बांधव पांढरे वस्त्र परिधान केलेले असुन डोक्यावर निळा फेटा बांधलेले होते सोबतच मिरवणुकीत महीला तसेच शालेय मुलींचे लेझीम पथक डीजे च्या तालावर नाचत होते. हे लेझीम पथक गावातील जनतेचे खास आकर्षन ठरले चौकाचौकात मोठ्या प्रमाणात लेझीम पथक चे नृत्य बघण्यासाठी जनतेनी गर्दी केलेली होती. म .फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयघोषाने रत्नापूर नगर दुमदुमले होते. मिरवणुक दुर्गा माता चौकात आल्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमाकांत लोधे यांनी सरबत पाजुन सर्वांचे स्वागत केले.मिरवणुक वापस डॉ. बाबासाहेब यांचे पुतळ्याजवळ आल्यावर मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

सायंकाळी मार्गदर्शन पर कार्यक्रमाला सुरवात झाली यावेळी अध्यक्षस्थानी मनोज मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच सदाशिव मेश्राम, ग्राम पंचायत सदस्य मंगेश मेश्राम, गजानन मेश्राम ,बौद्ध समाज अध्यक्ष सुनिल डेकाटे, सचिव रंजीत मेश्राम, भिमराव मेश्राम ,समतादूत कृपाली दडमल, दिपा मेश्राम, रमाबाई महीला मंडळ अध्यक्ष शिल्पा मेश्राम ,सचिव शालु मेश्राम आदी मान्यवर मंचावर उपस्थीत होते. बौद्ध विहारातील पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन मनोज मेश्राम यांनी केले तर निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन माजी सरपंच सदाशिव मेश्राम यांनी केले.
यावेळी पाहुण्यांनी उपस्थीत जनतेला महात्मा फुले व डॉ बाबासाहेब यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकुण मार्गदर्शन केले. शालेय विद्यार्थी यांनी भाषण दिले.विविध झालेल्या स्पर्धतील विजेत्यांना बक्षीस पाहुरण्याचे हस्ते देण्यात आले. वैशाली मेश्राम यांनी उपस्थितांना बौद्ध वंदना ग्रहन केली.
वरील कार्यक्रमाचे प्संचालन धिरज मेश्राम यांनी तर आभार दिलीप मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बौद्ध समाज ,रमाबाई महीला मंडळ व रिपब्लीकन विद्यार्थी फेडरेशन शाखा रत्नापूर येथील सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले.














