आप चे जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांची चौकशीची मागणी
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांना मतदानाचा मूलभूत हक्क बजावणे शक्य होणार नाही.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांचेही नाव गैरप्रकारामुळे मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. यासंदर्भात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गैरप्रकारांची छोकशी समिती स्थापन करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “मतदान हा लोकशाहीचा आत्मा आहे. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीची हत्याच होय. अशा घटनांमुळे लोकशाहीची प्रक्रिया बिघडते. मतदार यादीतून गैरप्रकारामुळे नावे वगळण्याची ही घटना अत्यंत गंभीर असून याची सखोल छोकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.”
मतदार यादीमध्ये झालेल्या अशा गैरप्रकारांमुळे अनेकांचा मतदानाचा मूलभूत हक्क हिरावला जाणार आहे. लोकशाही व्यवस्थेतील मतदानाचे महत्त्व लक्षात घेता ही घटना अतिशय गंभीर आहे. आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे याकडे तात्काळ लक्ष देण्याची व गैरप्रकारांची सखोल छोकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना धक्का निवडणूक आयोगने लावला आहे.

