prabodhini news logo
Home चंद्रपूर नवरगांव लोकमत सखी मंच तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा फुले...

नवरगांव लोकमत सखी मंच तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

0
256

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

लोकमत सखी मंच नवरगाव तर्फे विश्वरत्न,बोधिसत्व,महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रत्नापूर ग्रामपंचायतच्या सरपंच नजरीताई मेश्राम यांनी भूषविले.तर प्रमुख पाहुणे म्हणून नवरगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच स्वाती लोणकर व लोकमत संयोजिका व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या जिल्हा महिलाध्यक्षा चंद्रपूर गीता सुरेश सलामे, छाया कामडी आदी मान्यवर उपस्थित होते. उज्वला डांगे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर गीत सादर केले आणि सर्व सदस्यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाला ममता चौधरी, हर्षा परचाके, लीना डांगे, वीणा चौधरी, डांगे आदी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत सदस्य रत्नापूर रजनी काऊलकर यांनी केले. आभारप्रदर्शन वीणा चौधरी हिने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here