prabodhini news logo
Home चंद्रपूर खेडमक्ता येथील बहुसंख्य महिला, युवक व पुरुषांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश

खेडमक्ता येथील बहुसंख्य महिला, युवक व पुरुषांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश

0
752

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रमुख उपस्थिती

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

केंद्रातील मोदी सरकार केवळ धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. विकास मात्र बाजूला अडगळीत पडला आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असुन काॅंग्रेस पक्षाकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा कल वाढलेला असुन ब्रम्हपूरी तालुक्यातील खेडमक्ता येथील बहुसंख्य महिला, युवक व पुरुषांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विकासकामांवर व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून सदर पक्षप्रवेश करण्यात आला आहे.

यावेळी पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी जि.प.अध्यक्ष सतीश वारजूरकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष नामदेव लांजेवार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये दुर्वास समर्थ, अरविंद नागोसे, राजू मुळे, अमीत महाडोरे, अंकीत लेनगुरे, प्रमोद मानकर, निलेश मोहुर्ले, विष्णू टेकाम, सागर मोहुर्ले, केशव मानकर, राकेश मेश्राम, कमलेश मुळे, सुनील मेश्राम, ज्ञानेश्वर गोतमारे, प्रतिक डांगे, पंढरी देशमुख, राहुल भोयर, अभय ठाकरे, आकाश झरकर, अक्षय ठाकरे, संदीप मेश्राम, संदीप ठाकरे, राजेश्वर समर्थ, साईनाथ गुरनूले, संदीप मेश्राम, अमरदीप ठाकरे, रविना भोयर, मिनाक्षी मुळे, प्रिया नागोसे, रेश्मा समर्थ, दिपा गुरनूले, सौ.कांचनमाला गुरनूले, शालीनी मेश्राम शुभांगी मेश्राम, शूभम मेश्राम यांसह अन्य कार्यकर्त्यांनी यावेळी पक्षप्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here