prabodhini news logo
Home चंद्रपूर विमित दहिवले यांना आंबेडकरी रिल्स स्टार पुरस्काराने सन्मानित

विमित दहिवले यांना आंबेडकरी रिल्स स्टार पुरस्काराने सन्मानित

0
260

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

युवा प्रबोधन साहित्य विचार मंच मावळ जिल्हा पुणे यांच्या वतीने
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निम्मित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या तळेगाव दाभाडे येथे आंबेडकरी रिल्स स्टार फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच विमीत दहिवले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व कलेच्या क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..

यावेळी युवा प्रबोधन साहित्य विचार मंच मावळ चे अध्यक्ष सागरभाऊ वाघमारे, नितिन सुर्यवंशी डायरेक्ट ईशान्य ग्रुप ऑफ कंपनी, संजय कुलकर्णी अध्यक्ष वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट मावळ तालुका, डॉ. अमर चौरे अध्यक्ष माय रमाई फाउंडेशन, बाळराजे शेळके ब्ल्यू टाइगर समजिक संघटना यांच्या उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here