वर्धा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
वर्धा आगरगाव स्थानिक: यशवंत विद्यालय आगरगाव येथे गरजू विद्यार्थ्यांना प्रभारी मुख्याध्यापक आयु.अभय कुंभारे यांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक अभय कुंभारे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नीरज भिमटे,कार्यक्रम अधिकारी व प्रवीण चिव्हाणे,समन्वयक अधिकारी हे उपस्थित होते.
गावातील व आजूबाजूच्या खेड्यातील मुले शाळेत शिकायला येतात. त्यापैकी आर्थिक दुर्बल आदिवासी मुले सुद्धा शाळेत आहेत. त्यांना सहज शाळेत येता यावे व त्यांच्या शिक्षणात भर पडावी या उद्दात हेतूने शाळेतील मुलींना कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन तर्फे सायकल वितरीत करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्र संचालन भूमिका टेकाम हिने केले तर उपस्थितांचे आभार नेहा रोम हिने मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शिक्षक शशिकांत सानप, कविता डेकाटे, शिक्षकेतर कर्मचारी दिनेश नेहारे व शाळेतील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

