prabodhini news logo
Home ठळक बातम्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत- मुख्याध्यापक अभय कुंभारे यांच्या हस्ते

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत- मुख्याध्यापक अभय कुंभारे यांच्या हस्ते

0
224

वर्धा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

आगरगाव:स्थानिक यशवंत विद्यालय आगरगाव येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अभय कुंभारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कविता डेकाटे या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक अभय कुंभारे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली व भीमगीताच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक अभय कुंभारे म्हणाले की, बाबासाहेबांनी महिलांचे समान हक्क, लोकसंख्या नियंत्रण,समान नागरी संहिता आणि मूलभूत जबाबदाऱ्या याविषयी लोकांना जागृत केले तसेच बाबासाहेब नेहमी म्हणायचे की, स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मोजीत असतो. त्यांच्या पुरोगामी विचारांमुळेच ते आज कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यानंतर तासभर विद्यार्थ्यांनी विविध विषयाच्या पुस्तकांचे वाचन केले.यावेळी शाळेच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन भूमिका टेकाम हिने तर आभार प्रदर्शन कोमल नेहारे हिने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शशिकांत सानप, कविता डेकाटे व शिक्षकेतर कर्मचारी दिनेश नेहारे यांनी परिश्रम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here