हंडरगुळी परिसरातील चिञ
लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी – सध्या लोकसभा निवडणुक प्रचारा सह विवाह समारंभाची लगीन घाई सुरु असुन,उमेदवार व कार्यकर्ते हे लग्नाच्या मांडवात प्रचार करतानाचे चिञ हंडरगुळी व परिसरातील अनेक गावात दिसत आहे.
यंदा लग्न समारंभासाठी निवडकच मुहूर्त असल्याने हंडरगुळीसह हाळी, सुकणी, मोरतळवाडी, चिमाचीवाडी, रुद्रवाडी, वडगाव, शेळगाव, वायगाव या व अन्य गावात लग्न होत आहेत. तसेच या दरम्यान लोकसभा लढवित असलेले विविध पक्षाचे व अपक्षांचे उमेदवार लग्न समारंभास उपस्थित राहून व-हाडी मंडळींशी प्रचार करित असल्याचे बोलले जाते.तसेच कांही उमेदवार हे कार्यकर्त्यासह स्मशान भुमीत मयताच्या अंत्यसंस्कारालाही हजर राहत असल्याचेही बोलले जाते एकुणच अशा सुख आणी दु:खाच्या प्रसंगात हजेरी लावताना माञ अनेक उमेदवार व कार्यकर्ते यांची तारांबळ उडत आहे.म्हत्वाचे म्हणजे लग्नाच्या शुभेच्छा घ्या अण् मला मत द्या.असे साकडे उमेदवार व कार्यकर्ते घालतात ऐरवी लग्न व मौतीला जाणुबुजून गैरहजर राहणारे नेते,कार्यकर्ते ,पुढारी हे सध्या निवडणुका असल्यामुळे न कळवताही जातीने लग्नाच्यामांडवात व अंत्यसंस्कारात हजर राहतात.अण् स्मशानभुमीत सांत्वन करणारे कांही पुढारी लग्नाच्या मांडवात आर्शीवाद देतात.अशी चर्चा ऐकू येते. लग्नाचा मांडव बनला राजकीय स्टेज आजवर अनेक पक्षाचे नेते,पुढारी यांच्या ऐवजी त्यांचे कार्यकर्ते हेच मतदारसंघातील सुख-दु:ख प्रसंगी हजर राहत होते. पण यंदा लग्नाच्या हंगामातच देशात लोकसभा निवडणुकांचा सण, उत्सव सुरु झाला असुन, कार्यकर्त्याच्या विनंतीवरुन उमेदवार व पुढारी हे लग्नाच्या मांडवात शेकडो कार्यकर्त्या सह हजर राहून वधू-वरांना आर्शीवाद देताना आणी मत मागताना दिसतात. यामुळे वधू-वरा कडील व-हाडी लोकं माञ जो येईल त्या उमेदवारास फक्त ओके आणी आम्ही तुमचेच.असे गोड बोलून उमेदवारासह कार्यकर्त्यांची बोळवन करताना दिसतात.एकंदरीत पाहता यंदा लग्नाच्या घाईत देशात निवडणुकीची लगीनघाई ही सुरु झाली असुन लग्नाचा मांडव लोक – सभा निवडणुक प्रचारकांचे स्टेच बनल्याचे चिञ हंडरगुळी परिसरात दिसुन येत आहे..

