कार्डधारक गॅसवर आणि सिलिंडर दिसतो टी स्टाॅलवर;हाळीतील चिञ..

0
107

लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

हंडरगुळ – व्यावसायीक सिलिंडर पेक्षा घरगुती सिलिंडरची किंमत कमी असल्यामुळे तसेच तहसील व जिल्हा पुरवठा खाते जाणुनबुजून दुर्लक्ष करित असल्याने हाळी व परिसरातील ढाबे व टी स्टाॅल मध्ये घरगुती वापराचे गॅस सिलिंडरचा जाळ { वापर } होताना दिसुन येतो.यामुळे कार्डधारकांना गॅसवर म्हणजे 8 / 8 दिवर वेटींगवर ठेवणारे येथील सबडिलर लग्न व अन्य समारंभात व हाॅटेलला सिलिंडर बेभावात विकतात.तेंव्हा अशा प्रकारे घरगुती गॅस वापरणा-या व्यापा-यावर व सबडिलरवर कारवाई करावी.अशी मागणी कार्डधारकांतुन होत आहे.. उज्वला अन्य योजनेतील घरगुती गॅस वापरणारे हजारो लाभार्थी व कांही वाहनधारकही हंडरगुळी व परिसरात आहेत.पण येथे मेन ऐवजी 6 सब —डिलर आहेत.व यांना वाढवणा बुद्रुक व अहमदपुर येथून टाक्यांचा येतात. तसेच या भागातील वाढवणा,किनी, वायगाव पाटी आदी ठिकाणी शेकडो हाॅटेल्स असुन यातील बहूतांश हाॅटेल मध्ये घरगुती वापराचे गॅस वापरताना जनतेला दिसुत येते.माञ संबंधित अधिका-याना दिसत कसे नाही.याचे नवल वाटते.तसेच संबंधित यंञणेला हाताशी धरुन हंडरगुळीतील एच.पी. व बी.पी.गॅसचे सबडिलर सिलिंडरचा दिनदहाडे काळाबाजार करतात जोमात.व्यावसायीक गॅस महाग आहे म्हणुन घरगुती वापराचे व कमी दराचे गॅस बहूतांश हाॅटेलवाले उघडपणे व उघड्यावरच वापरतात.तसेच कांही वाहनांमध्येही संबंधित यंञणेला हाती धरुन गॅस भरला जातो.व यावेळी कसलीच दक्षता घेतली नाही.म्हणुन धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लग्न व अन्य सार्वजनिक समारंभात घरगुती गॅसचा उघडउघड वापर होतो.आणी आजवर एकाही अधिका-याने कारवाईचे धाडस केले नाही.माञ सबडिलरवाले घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करण्याचे धाडस करताना अधिका-याना देऊन, घेऊन करत असावेत.अशी चर्चा आहे.
भर बाजार पेठेत होते विक्री – घरगुती व व्यावसायीक वापराच्या गॅस सिलिंडरचे गोडाऊन व विक्रीचे दुकाण हे मार्केटच्या बाहेर असायला पाहीजे.माञ येथे असलेले सर्व गॅस विक्रेत्यांचे गोडाऊन व दुकाणं हे भर बाजार पेठेमध्ये आहेत.आणि याची सगळी कल्पना संबंधित यंञणेला आहे.तसेच आम्ही घरगुती सिलिंडर काळ्याबाजारात विक्री करतोत.हे ही संबंधित अधिका-याला माहिती आहे. पण ते त्यांचे ठरलेले मंथली पॅकेट न चुकता त्यांना मिळत असल्यामुळे ते अधिकारी आमच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवित नाहीत.पन आम्ही माञ गॅसचा काळाबाजार दिन दहाडे करायचे धाडस करतोत.अशी माहिती एका सबडिलरने दिली आहे.. तेंव्हा तहसीलदार व जिल्हाधिकारी हे महाशय तरी गॅसचा काळाबाजार करणा-या व मार्केट मध्ये दुकाणदारी थाटलेल्या सबडिलरवर कारवाई करण्याचे धाडस दाखवुन जरब बसवतील का व कधी.याकडे हाळी व हंडरगुळी परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here