
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र राज्य, तालुका शाखा सिंदेवाही यांचे नेतृत्वाखाली “जिल्हास्तरीय युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिर २०२४ सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे दि.२४ एप्रिल २०२४ रोज बुधवारला उद्घाटनिय सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रामराव नन्नावरे, उद्घाटक अरविंद सांदेकर (सन्मन्वय समिती नागपूर, सहउद्घाटक गंगाधर श्रीरामे चंद्रपूर जिल्हा महासचिव आदिम जमात मंडळ मुंबई, अरविंद सोनवाने,हिवराज जिवतोडे, रणजीत सावसाकडे, अमोल नागोसे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर , धिरज दांडेकर तालुकाध्यक्ष सिंदेवाही,सुभाष कारमेंगे सल्लागार तालुका सिंदेवाही, शेषराव कारमेंगे, ज्ञानेश्वर नन्नावरे , राजु नन्नावरे,दिलीप चौके, वासुदेव श्रीरामे ,कृपाली दडमल समतादूत व समस्त माना जमात बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गायत्री धारणे , हिने केले.कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व जिल्हाशाखा चंद्रपूर पदाधिकारी यांचे व तालुका शाखा सिंदेवाही यांचे व आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त केले.















आदिवासीच्या समस्या सोडविण्यास अशाप्रकारे शिबिर आवश्यक आहे.