prabodhini news logo
Home ठळक बातम्या चांगभलं च्या गजरात ज्योतिबा चैत्र यात्रेच्या सासन काठयांच्या उत्सवाची सांगता

चांगभलं च्या गजरात ज्योतिबा चैत्र यात्रेच्या सासन काठयांच्या उत्सवाची सांगता

0
231

अण्णासाहेब कदम.
सदलगा शहर प्रतिनिधी

ज्योतिबाच्या नावाने चांगभलं च्या गजरात दख्खनचा राजा श्री ज्योतिबा राजाची चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न आणि कर्नाटक व सीमा भागातील सर्व सासन काठया चैत्र यात्रा संपवून आपल्या मूळ गावी सुखरूपपणे काल परतल्या.

श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथे दख्खनचा राजा श्री ज्योतिबा यांच्या चैत्र यात्रेनिमित्त सीमा भागातील अनेक खेड्यातून भेटीसाठी सासनकाठया वाडी रत्नागिरी येथे पायी प्रवासाने प्रत्येक वर्षी जात असतात. त्याप्रमाणे यावर्षीही या सासनकाठया चैत्र यात्रेनिमित्त जाऊन आपली भक्तिभावाने ज्योतिबा राजाची सेवा करून आपल्या मूळ गावी काल मार्गस्थ झाल्या आहेत. या सासनकाठया पायी प्रवासाने वाजत गाजत जातात ,त्यामुळे किमान चार ते पाच दिवसाचा पायी प्रवास ज्योतिबाच्या भक्तांना करावा लागतो. त्यात उन्हाचा कडाका, वळिव पावसाची हजेरी, पिण्याच्या पाण्याची टंचाई त्यामुळे भक्तांना या सर्व अडचणीवर मात करून दख्खनच्या राजाची सेवा पूर्ण करून सुखरूप पणे यावे लागते. या सीमा भागातील सर्व ज्योतिबा भक्तांची शासनाकडे एकच मागणी आहे की वर्षभर शासनकाठया योग्य रीतीने पूजाअर्चा करून सांभाळाव्या लागतात त्याचा खर्च भरपूर आहे त्यामुळे त्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी आणि त्यांना सहकार्य करावे असेही या यात्रेतील भक्तांनी आपले मत व्यक्त केले आहे. सीमा भागातील सदलगा, मलिकवाड, एकसंबा, बोरगाव या भागातील किमान 70 ते 80 शासनकाट्या या चैत्र यात्रेनिमित्त वाडी रत्नागिरी येथे यात्रेसाठी गेलेले असतात .त्या काल आपल्या मूळ गावी पोहोचल्या. या सासनकाठी सोबत किमान 50 ते 60 महिला व पुरुष भक्तगण असतात वाटेत देवाची भक्ती करत जेवण चहा नाश्ता आणि मित्रत्वाचा एकोपा देवाची गाणी व शासनकाठी नाचवणे यातून आनंद प्राप्ती या सर्व गुणांचा संगम या ठिकाणी या ज्योतिबा राजाच्या यात्रेमध्ये पाहाव्यास मिळतो. यामध्ये तीस ते चाळीस वर्षांपासून पायी जाणारे भक्त आपल्या वयाची 80 आणि 90 वर्षे ओलांडले तरी ते पायी प्रवास करून ज्योतिबावर आपली भक्ती आहे हे दाखवून देतात हे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य या ज्योतिबा चैत्र यात्रेचे मानावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here