

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
अमरावती – स्थानिक खाटीक समाज परिवर्तन संघटनेतर्फे दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, व समाजहिताचे कार्यक्रम राबविले जातात त्यात समाजातील वधू-वरांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यावर्षी सुद्धा सदर विवाह सोहळा संघटनेच्या जुनाबाय पास बडनेरा रोड स्थित तीस हजार स्के.फुट जागेवर १८ मे २०२४ रोजी सायं ७ वा.विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी व संपूर्ण राज्यभरातून पाच हजार च्या वर आलेल्या समाज बांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी सूत्रसंचालन मोहन नेहर यांनी केले तर प्रमुख पाहुणे समाज बांधव कृणाल कंटाळे युवा उद्योजक पुणे व अध्यक्ष नंदु हरणे यांच्याहस्ते डॉ.संतूजी लाड यांच्या प्रतिमेला हारार्पण करून सोहळ्यास सुरवात करण्यात आली. यावेळी खाटीक समाज परिवर्तन संघटनेचे सर्व शाखा प्रमुख, पदाधिकारी व समाजातील गुणवत्ता प्राप्त यांचा शाल,श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.या सोहळ्यात एकूण चार जोडप्यांचे विवाह रितिरिवाजानुसार लावण्यात आले.वरांची घोड्यांवरुन वरात, वधूवरांचा बग्गी प्रवेश, भव्य आतिषबा, आर्केष्ट्रा, द्रोण कॅमेऱ्यातून शूटिंग, लाईव्ह दृश्य, विशेष म्हणजे संघटनेचे अध्यक्ष नंदू हरणे यांच्या मुलाचा विवाह हे या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले.उपस्थित सर्व समाज बांधवांनी नवदाम्पत्यास सुभाशीर्वाद देऊन भावी जीवनासाठी सुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात संघटनेच्या जागेवर समाज बांधवांना बसण्यासाठी पाच हजार खुर्च्या,मान्यवर व लोकप्रतिनिधी यांना बसण्यासाठी स्वतंत्र सोफे, महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र तीस हजार स्के.फुट जागेवर जेवणाची व्यवस्था,तसेच पार्किंग साठी स्वतंत्र तीस हजार स्के.फुट जागा, महानगरपालिकेचे स्वतंत्र सुलभ शौचालय, पाणी व्यवस्था, वधू-वरांच्या नातेवाईकांसाठी राहण्यासाठी स्वतंत्र रूम ई.व्यवस्था करण्यात आली होती. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष नंदू हरणे व सर्व शाखा प्रमुख व पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.














