
फुटपाथ चे ठेले हटावच्याच नावावरती महनगरपालिका भरत आहे तिजोरी.
रोशन शेख
चंद्रपूर
एकीकडे आकाश गगणाला भिडलेली वाढती महागाई वं दिवसेंदिवस सर्वत्र वाढत असलेली बेरोजगारी.आणि याच वाढत्या महागाईच्या काळात बेरोजगार जनसामान्य साधारण व्यक्ति कशे बशे तरी फुटपाथ वरती पोट भरुन आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करुन संसाराचा गाडा हाकतांना दिसत आहे.तर दुसरिकडे चंद्रपुर शहरातल्या महानगर पालिकेतर्फे फुटपाथ वरती पोट भरणा-या गरिब लोकांचे ठेले दुकान हटविन्यात येत आहे.महत्वाची गोष्टं ही आहे की चंद्रपुर शहराची महानगरपालिकाच बाजार फी टेंन्डरिंग च्या नावावरती लाखो रुपयांची टेंन्डरिंग काढते.त्या टेंन्डरिंग मध्ये एखाद्या निवडक व्यक्तिला बाजार फी टेंन्डरिंग दिले जाते.त्या टेंन्डरिंग मध्ये बाजार फी ची किंमत ठरवली जात असुन बाजार फी टिकीट ची किंमत १५ रुपये अशि ठरवली जात असुन ही १५ रुपये बाजार फी फुटपाथ वरती पोट भरणा-या लोकांना टॅक्स स्वरुपात तर लागु होतेच.पण रसत्यांनी फिरणा-या फेरिवाल्या पासुन ते गलो गलीत ठेले.सायकल वरती फळ फ्रुट व ईतर वस्तु विकणा-या लोकांना सुद्धा १५ रुपये बाजार फी लागु केली जाते.मग प्रश्नं असा पडतो की महानगर पालिकाच ठेकेदार पद्धतिने बाजार फी टेंन्डरिंग च्या नावावरती लाखो रुपयांचे टेंन्डरिंग काढते.वं तशेच ठेकेदार पद्धति प्रमाणे बाजार फी टेंन्डरिंग च्या नावावरती रोड च्या कडेने वं तशेच फुटपाथ वरती पोट भरणा-या गरिब लोकांन्डुन १५ रुपये बाजार फी टॅक्स स्वरुपात वसुल केली जाते.मग बाजार फी घेतल्या नंतर सुद्धा रोडच्या कडेने वं फुटपाथ वरती पोट भरणा-या लोकांन्वरती चंद्रपुर शहर महानगरपालिके तर्फे कार्वाई का बरं केली जाते.जर फुटपाथ वरती पोट भरणा-या लोकांचे दुकान. ठेले.महानगर पालिकेला हटवायचेच असतात.तर महानगरपालिकेचे आयुक्त वं संपूर्ण महानगरपालिका ठेकेदार पद्धतीने १५ रुपये बाजार फी टेंन्डरिंग काढतातच कशाला हा सुद्धा खुप महत्वाचा प्रश्नं आहे. ज्या टॅक्स पेअर.कर दातांच्या भरोशावरती.कलेक्टर.आयुक्तं.
पालकमंत्री.खासदार.आमदार.
नेत्यांचा.संपुर्णमहानगरपालिकेचा पगार होतो. त्याच टॅक्स पेअर.कर दात्यांचे फुटपाथ वरती लागणारे ठेले दुकान चंद्रपुर शहरातल्या महानगर पालिकेतर्फे हटविल्याचे चित्र दिसुन येत आहे.आणि अशातच महानगर पालिका बाजार फी टेंन्डरिंग वाले बाजार फी टेंन्डरिंग च्या नावावरती फुटपाथ वरती पोट भरणा-या गरिब लोकांन्कडुन जोर जबरदस्तिने पिवळी चिठ्ठी देऊन १५ रुपये बाजार फी वसुल करतांना सुद्धा दिसत आहे. फुटपाथ वरती पोट भरणा-या गरिब लोकांचे ठेले दुकान महानगरपालिका तर्फे हटविन्यात येत असुन लोकशाहीच्या मतदात्यांना त्यांचे हक्क त्यांना द्यायसाठीे चंद्रपुर शहराच्या एकाही नेत्यांनी पुढाकार घेतला नसुन हा विषय सुद्धा चर्चेचा ठरला आहे.आणि एक प्रश्नं असा सुद्धा पडतो की फुटपाथ वरती पोट भरणारे गरिब नागरिक लोकशाही चे हकदार नेत्यांसाठी फक्तं आणि फक्तं लोकशाही म्हणजेच मतदाना पुरताच का.जेव्हा फुटपाथ वरती पोट भरणा-या लोकशाहीच्या मतदात्यांच्या हकदारांच्या पोटावरती महानगरपालिका लात मारते तेव्हा चंद्रपुर शहरातले नेते गाढ झोपेत वं अदृष्य का बरं असतात.फुटपाथ वरती पोट भरणा-या लोकशाहीच्या मतदात्यांनी हा प्रश्नं समजुन घेणे सुद्धा महत्वाचे आहे.
फुटपाथ वरती पोट भरणारे काही नागरिक फुटपाथ चे ठेले हटल्यानंतर सुध्दा घरची चुल पेटु शकेल या आशेनी पुन्हा एकदा फुटपाथ वरती ठेले दुकान लाऊन कशे बशे तरी पोट भरन्याचा प्रयत्नं करित आहे.पन बाजार फी टेंन्डरिंग चिठ्ठी वाले फुटपाथ वरती पोट भरणा-या गरिब लोकांन्कडुन मुजोरी आणि जोर जबरदस्तिने १५ रुपये बाजार फी वसुल करित आहे.फुटपाथ वरती पोट भरणा-या एका प्रभागामध्ये आज १५ रुपये बाजार फि घेणारे लोकं आले असता त्या प्रभागामध्ये फुटपाथ वरती चहा नास्ता विकणा-या काकुंना १५ रुपये बाजार फी मागितली.पण त्या प्रभागामध्ये फुटपाथ वरती पोट भरणा-या काकुनी बाजार फी वाल्यांना १५ रुपये देन्यास नकार दिला.चहा नास्ता विकणा-या काकुंनी बाजार फी घेणा-या लोकांना थेट प्रश्नं मांडला की जर आमचे दुकान ठेले महानगरपालिका हटवित असुन आम्ही दर रोज १५ रुपये बाजार फी द्यायचीच कशाला.पण बाजार फी वाले फुटपाथ वरती पोट भरणा-या गरिब काकुंना म्हणाले की जर तुम्ही १५ रुपये बाजार फी दिली नाही.तर फुटपाथ वरती व कुठेही ठेला दुकान लावायचा नाही अशि बाचाबाची करायला लागले.पण त्याच वेळी चहा नास्ता विकणा-या काकुने १५ रुपये बाजार फी वसुल करणा-या व्यक्तीला त्याच्याच भाषेत परत ऊत्तर देतांना म्हटले की जर तु परत मला दुस-यांदा जोर जबरदस्तिने १५ रुपये बाजार फी मागितला तर मी तुझ्या नावाने आणि महानगरपालिकेच्या नावाने ईथेच आत्महत्या करेल.आणि मी आत्माहत्या केल्यास माझ्या आत्माहत्येचे जवाबदार तु आणि महानगरपालिका राहील.असा ईशारा सुद्धा चहा नास्ता विकणा-या काकुंनी बाजार फी मागणा-या लोकांना दिला.आमचे दुकान वं ठेले महानगरपालिका हटवित असुन तुले बाजार फी १५ रुपये द्यायचिच कशाला.हा प्रश्नं सुद्धा चहा नास्ता विकणा-या काकुंनी बाजार फी मागणा-या लोकांना केला.तर प्रश्नं असा पडला की चंद्रपुर शहरातल्या महानगर पालिके तर्फे फुटपाथ वरती लागणारे ठेले दुकान हटविन्यात येत असुन सुद्धा बाजार फी वाले जर जोर जबरदस्तिने १५ रुपये मागत आसेल तर मग बाजार फी वाल्यांना १५ रुपये द्यायचेच कशाला.असा प्रश्नं सुद्धा फुटपाथ वरती पोट भरणारे नागरिक महानगरपालिकेला करतांना दिसत आहे.महानगरपालिकेने बाजार फी टेंन्डरिंग च्या नावावरती फुट पाथ वरती पोट भरणा-या लोकांना १५ रुपये बाजार फी जोर जबरदस्तिने मागितल्यास फुट पाथ वरती पोट भरणा-यांपैकी त्या व्यक्तींपैकी कुणि जर आत्महत्या करेल तर याची जवाबदारी महानगरपालिका, महानगर पालिकेचे आयुक्त, कलेक्टर, पालकमंत्री, खासदार, आमदार घेतील का.हा सुद्धा खुप महत्वाचा प्रश्नं आहे.या सर्व घडामोंडिवरती वरती आमची नजर टिकलेली असुन फुटपाथ वरती पोट भरणा-या गरिब लोकांना न्याय केव्हा मिळेल.या कडे सर्वांचे लक्षं लागले आहे.














