Home औसा औसा येथे भीम आर्मीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

औसा येथे भीम आर्मीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
127

लक्ष्मण कांबळे लातूर प्रतिनिधी, औसा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल रोजी औसा येथे भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. लातूर-उमरगा मार्गावरील तसेच औसा शहरातील मुख्य रस्त्यावर पहिल्यांदाच भव्य स्टेज उभारून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. दिवसभर या ठिकाणी अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिकांनी भेट देत अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांनी डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला. कार्यक्रमामुळे परिसरात सामाजिक एकात्मता आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here