prabodhini news logo
Home चंद्रपूर आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत इंटरनॅशनल शितो रयु कराटे कुबुडो काई ऑर्गनायझेशन चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांचे...

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत इंटरनॅशनल शितो रयु कराटे कुबुडो काई ऑर्गनायझेशन चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांचे सुयश.

0
305

प्रणय बसेशंकर
प्रबोधिनी न्यूज़

नेपाळ शोतोकान कराटे असोसिएशन, अंतर्गत इंटरनॅशनल कराटे स्पर्धा दिनांक २५ आणि २६ मे २०२४ रोजी दसरथ क्रीडासंकुल नेपाळ येथे आयोजित करण्यात आली होती. यात विविध देशातील विद्यार्थ्यांनी सहभाग केला होता.
यातील इंटरनॅशनल शितो रयु कराटे कुबुडो काई ऑर्गनायझेशन असोसिएशन चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत विजय प्राप्त केला. त्यात वयोगट १७ आणि त्या वरील वयोगटाचा सामावेश होता.
खेळाचे प्रकार – काता आणि कुमिते १. वेदांत विकास शंभरकर – गोल्ड मेडल, ब्राँझ मेडल ( काता आणि कुमिते )२. अनुराग संतोष चुरेंद्र -ब्राँझ मेडल३. शंतनू बबन भागवत- सहभाग ४. अस्मित अर्जित सिंग- सहभाग संस्थेचे अध्यक्ष (मास्टर) मान.श संतोष रतन कडपेवाले उपाध्यक्ष रमेश कोडारी आणि सचिव मोहीतकुमार साहू यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व कोचेस व पालकगण यांनी देखील विद्यार्थ्यांच्या यशाकरिता शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here