prabodhini news logo
Home चंद्रपूर विमीत दहिवले यांना आदर्श युवा पुरस्काराने सन्मानित

विमीत दहिवले यांना आदर्श युवा पुरस्काराने सन्मानित

0
159

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच विमीत दहिवले यांना पुणे येथे दि. २ जून २०२४ ला झालेल्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगीरी बद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सत्यशोधक सामाजिक फाउंडेशन, सर्च फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात विवीध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक मान्यवरानी हजेरी लावली.
गेले काही वर्षापासून विमीत दहिवले हे अनेक सामाजिक उपक्रम राबवून युवकांना प्रेरणा देत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल अनेकदा घेतल्या गेली.आणि नुकताच त्यांना पुणे येथे महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श युवा पुरस्काराने
निवृत्त कमांडो रघुनाथ सावंत,युवा उद्योजक नितिन सुर्यवंशी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र , भारतीय संविधान देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह पुणे येथे गौरविण्यात आले.यावेळी अभिनेते बाळराजे वाळूजकर, साहित्यिक चंद्रकांत तायडे, दृष्टि जैन, सिमा राऊत,विविध क्षेत्रातील कवी,लेखक,प्रशासकीय सेवेतील अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here