prabodhini news logo
Home चंद्रपूर माकडाने बालिकेस घेतला चावा..

माकडाने बालिकेस घेतला चावा..

0
168

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

सिंदेवाही शहरात माकडांचा धुमाकूळ सुरू असून शहरातील प्रभाग क्रमांक ३ येथे जवळपास काल सायंकाळी सहाच्या सुमारास मुले अंगणात खेळत असताना अचानक एकापाठून एक माकडे आली. तेव्हा गौतमी प्रविण नागदेवते वय १० वर्ष ही मुलगी आपल्या घरच्या दरवाज्यात बसून मुलांचा खेळ बघत असताना माकडाने तिला दरवाज्यात येऊन चावा घेतला. लगेच गौतमी हिला स्थानीय ग्रामीण रुग्णालय येथे नेऊन त्यावर उपचार केला. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचार करिता तिला जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे रवाना केले. सद्यस्थितीत माकडांचा शहरात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू असून प्रभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. करिता सदर बाबीची दाखल घेऊन वन अधिकारी यांनी माकडांचा बंदोबस्त करावा अशी त्या प्रभागातील लोकांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here