माजी उपसरपंच शिबीरकुमार चोले यांचा आरोप
वडेगाव येथील प्ररकार माहिती देण्यास टाळाटाळ
हितेंद्र वालदे
तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज, तिरोडा
तिरोडा – तालुक्यातील वडेगाव येथील ग्रामपंचायत चे सरपंच शामराव बिसेन व ग्रामसेवक जयंत तिडके यांनी इतर सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीच्या लेखाशिर्षक व १५ वित्त आयोगाच्या रक्कमेची अफरातफर केले आहे असा आरोप माजी उपसरपंच शिबीरकुमार चोले यांनी केला आहे. विशेष म्हणजे या संदर्भात ग्रामसेवक माहितीच्या अधिकार अधिनीयमातर्गत माहिती देण्यास टाळाटाळ करित आहेत.
वडेगाव येथील सरपंच व ग्रामससेवक हे दोघे जण आपल्या मनमर्जीने कामे करित आहेत. सामान्य फंड व १५ वा वित्त आयोगाची निधी कुणालाही विश्वासात न घेता किंबहुना कामांची जाहिरात प्रसिद्ध न करता परस्पर विल्लेवाट लावत आहेत या निधीअंतर्गत खरेदी केलेला साहित्य व अंगनवाडी साठी करण्यात आलेली कामे दिसून येत नाही असा आरोप माजी उपसरपंच शिबीरकुमार चोले यांनी केला आहे.
या संदर्भात ३० डिसेंबर २०२३ रोजी माहितीच्या अधिकार अधिनियमार्गत ग्रामसेवक जयंत तिडके यांना माहिती मागितली परंतु माहिती देण्यास ते टाळाटाळ करीत आहे. दरम्यान अपिलीय अधिकाऱ्याकडे २६ फेब्रुवारी रोजी अर्ज करण्यात आले या प्रकरणाची सुनावनी २२ मार्च रोजी करण्यात आली. खंडविकास अधिकाऱ्यानी ग्रामसेवक तिडके यांना ७ दिवसाच्या आत माहिती देण्याचे आदेश दिले मात्र खंडविकास अधिकारी तथा अपिलिय अधिकारी यांच्या आदेशालाही ग्रामसेवकाने कोराची टोपली दाखवली आहे.
ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात यावी तसेच यात सहभागी असलेले सरपंच शामराव बिसेन व ग्रामसेवक जयंत तिडके यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आरोपकर्ता शिबीरकुमार चोले यांनी केला आहे.
★ खरेदी केलेले साहित्य गेले कुठे?
वडेगाव ग्राम पंचायत प्रशासनाकडून प्राप्त निधीतून घंटागाडी, खुर्ची, कम्पुटर, आरओ, प्रिंटर, ब्लॅकबोर्ड, कचरापेट्या, हँलोजन बल्ब, अँम्लीफायर, अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश तसेच इतर साहित्य गेले कुठे? अशा प्रश्न आरोपकर्त्याने उपस्थित केला आहे.

