प्रबोधिनी न्युज नेटवर्क- मुक्ताईनगर शहरात पिण्याच्या पाण्याची बिकट अत्यंत परिस्थिती आहे,सी ओ साहेब गजानन तायडे यांना नागरिकांचे निवेदन घेण्यासाठी ही वेळ नाही,मुक्ताईनगर शहरात सात ते आठ दिवसा आड पाणी सोडले जात आहे, व अशीच परस्थिती दीपावली व ईद दिवशी दिसून आली, मुक्ताईनगर तून मुख्य जल वाहिनितून इतर शहरात पाणी सोडले जाते व शहर वासी पाण्यापासून वंचित आहेत,तसेच पाणी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. सदर निवेदन च्या प्रती मा. ना. रक्षा खडसे, मा. चंद्रकांत पाटील यांना देण्यात आल्या आहे. सदर निवेदन कार्यालयीन प्रमुख दिपक जगरवाल यांना देण्यात आले, व सर्व अडचणी व चर्चा करण्यात आली,त्यांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर सुवेवस्थित नियोजन करण्यात येईल, व पाणी सुरळीत सोडण्यात येईल असे आश्वासन दिले,निवेदन संघाचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर ए खान यांच्या सोबत खालील नागरिकांनी सह्यानिशी दिले. नासीर शेख, एजाज खान, फरीद शेख, फिरोझ शेख, गुलाम महोमद शेख,आरिफ बशीर,शेख रफिक, मोहसीन खान, मुजहिद शाह,शेख शब्बीर, मुस्टकीम खान, साहिल खान,फरहान शेख,जुबेर शेख हैदर, मुकद्दर शाह, हुजेफा खान, अशोक कोळी, रहीम शाह,रहीम खान,हसन खान, जाविद खान, फरीद शेख, इत्यादींनी निवेनाद्वारे मागणी केली.

