prabodhini news logo
Home चंद्रपूर सावली येथे नवनिर्वाचित काँग्रेस पक्षाचा खासदारांच्या स्वागत- सत्काराची जंगी तयारी

सावली येथे नवनिर्वाचित काँग्रेस पक्षाचा खासदारांच्या स्वागत- सत्काराची जंगी तयारी

0
129

प्रतिभा धानोरकर व डॉ.नामदेवराव किरसाण यांचे सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे स्वागत व सत्कार

विरोधी पक्षनेते मा.ना.विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती

सुविद्या बांबोडे
जिल्हा संपादिका
चंद्रपूर

सावली :- नुकतीच देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यात महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक १३ सीटा मिळाल्या त्यात विदर्भातील गडचिरोली व चंद्रपूर लोकसभेने सर्वांचे लक्ष वेधले होते त्यात. चंद्रपूर मधून श्रीमती.प्रतिभाताई धानोरकर व गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.श्री.डॉ.नामदेवराजी किरसाण हे लक्षावधी मताधिक्याने विजयी झाले.

आज दिनांक २३ जुन २०२४ रविवारला विरोधी पक्षनेते मा.ना.श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांचे जनसंपर्क व तालुका काँग्रेस पक्ष कार्यालय सावली येथे चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती.प्रतिभाताई धानोरकर व गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.श्री.डॉ.नामदेवराजी किरसाण साहेब यांचा संयुक्त सत्काराप्रसंगी नियोजन बैठकीचे आयोजन केले होते यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली व सर्वानुमते ६ तारीख ठरली तसेच सर्वांना आप आपली जबाबदारी देण्यात आली.

याप्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे जेष्ठ पदाधिकारी मा.पांडुरंगजी तांगडे,अध्यक्ष मा.नितीन गोहने,अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,माजी सभापती पंचायत समिती मा.विजय कोरेवार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी,युवा शहर अध्यक्ष मा.अमरदीप कोणपत्तीवार,मा.नरेश पाटील गड्डमवार,मा.मोहन गाडेवार,मा.राजेंद्र भोयर,नगरसेवक मा.प्रीतम गेडाम,मा.अंतबोध बोरकर,मा.नितेश रस्से,नगरसेविका सौ.साधना वाढई ,मा.दिलीप शेंडे,मा.भोगेश्वर मोहुर्ले,मा.ओमप्रकाश ढोलने, मा.श्रीकांत बहिरवार,मा.अरविंद भैसारे,मा.करणी स्वामी, मा.किशोर घोटेकर,मा.हरिदास मेश्राम, मा.राजू बुरीवार,मा.आकाश बुरीवार, मा.कमलेश गेडाम तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तागण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here