दिपाली पाटिल
जिल्हा उपसंपादिका
चंद्रपूर
आपल्या देशाची राजधानी दिल्ली मधे मुख्यमंत्री मा. अरविंदजी केजरीवाल सरकार तर्फे आम आदमी पार्टी सरकार तर्फे शिक्षण पूर्ण पणे मोफत देण्यात येत आहे दुसरी कडे आपल्याच महाराष्ट्रात आल्या दिवशी सरकारी व निमसरकारी शाळा बंद करण्याची घटना बघायला मिळत आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे..
आज आपल्या घुग्घुस क्षेत्रामध्ये शिक्षणाला घेउन असाच एक प्रकरण पहाला मिळत आहे. घुग्घुस येथे प्रियदर्शनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घुग्घुस आणि जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घुग्घुस आहेत इथे विज्ञान शाखेत 11व्या आणि 12व्या वर्गात प्रवेशाकरिता गोरगरीब विध्यार्थ्यांकडून शासकीय परवानगीशिवाय शुल्क आकारले जात आहे या कारणामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवेश घेण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे व पालकांना आर्थिक फटका बसत आहे. ही अवैधरीत्या शुल्क आकारणी तात्काळ बंद करून शुल्क आकारणाऱ्या विद्यालयातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवून उच्च स्तरीय कारवाई करण्यात यावी जेणेकरून शिक्षणाचा काळाबाजार कोणतेही शैक्षणिक आस्थापना करणार नाही.
जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,घुग्घुस आणि प्रियदर्शनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,घुग्घुस तर्फे अकरावी आणि बारावी प्रवेश करिता गरीब मुलान कडून बेकायदेशीर पाच ते वीस (5,000 ते 20,000)हजार रुपये घेण्यात येत आहे.शाळेच्या प्राचार्य आणि लिपिक द्वारे मुलांना शुक्ल न दिल्यास 11वी (अकरावी) करिता प्रवेश मिळणार नाही अशी धमकी सूद्धा देण्यात येत आहे.
आम आदमी पार्टी तर्फे हा प्रश्न करण्यात येत आहे की हे शुल्क वसुली करने संवैधानिक आहे काय असल्यास कुठल्या नियमाने हे शुल्क घेण्यात येत आहेत ते सांगण्यात यावे.
जर 2024-2025 शैक्षणिक वर्षी योग्यता(मेरिट बेसिस) नुसार प्रवेश नाही मिळाल्यास आणि तात्काळ कारवाई न केल्यास आम आदमी पार्टी जनआंदोलन उभारेल त्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल.
यावेळेस शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष विकास खाडे , युवा अध्यक्ष सचिन सिरसागर, सचिव संदीप पथाडे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

