
सुविद्या बांबोडे
जिल्हा संपादक
चंद्रपूर
भीम आर्मी (भारत एकता मिशन) संस्थापक अध्यक्ष मा.खासदार चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंघ यांच्या दृढनिश्चय, सकल्प आणि घवघवीत यश व राष्ट्र,महाराष्ट्र, विदर्भ कमिटीच्या कार्यास प्रेरित होऊन भिम आर्मी संघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर बाबुपेठ येथील अनेक युवक-पुरुष, युवती-महिला यांचा समावेश.
वार्ड तिथे शाखा हा मुख्य उद्देश ठेऊन भिम आर्मी चंद्रपूर युनिट अनेक अडचणींवर मात करीत, वारंवार भिम आर्मीचे कार्य, उद्देश आणि फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवून चंद्रपूर जिल्ह्यातील एक एक सैनिक त्यांना जोडण्याच्या कार्यात यश प्राप्त करीत आहे.
आणि त्याच प्रयत्नाचे यश म्हणजे आज दिनांक 7 जुलै रोजी जिल्हा अध्यक्ष सुरेन्द्र रायपुरे यांच्या अध्यक्षतेत व शहर उपाध्यक्ष धम्मा उराडे, महाकाली वार्ड शाखा प्रमुख सागर दुर्गे यांच्या नेतृत्वात, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर बाबुपेठ येथे शाखा गठीत करण्यात आली. ज्यात अनेक युवक-युवती, महिला-पुरुष यांनी भिम आर्मीत समावेश केला.
ज्यात शाखा अध्यक्ष पदी अमोल साखरे महिला अध्यक्ष पदी वंदना ढोक,उपाध्यक्ष पदी महेश भोयर महिला उपाध्यक्ष पदी मंदा टेम्भूर्णे, सचिव संतोष तेलंग, कोषाध्यक्ष पंकज बन्सोड ,सहसचिव अमित ताकसांडे,प्रवक्ता राजेश शेडमाके यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली ,तर कीरण देवगडे,काजल गोंगले, उमा गोंगले,अल्का भोयर,साधना गोंगले,विद्या टवले,वैशाली रामटेके, मोनाली साखरे, माधुरी धोपटे, अलवीरा टेम्बुर्ने, भोयर मैडम,प्रीति पिंपलकर, वैशाली साखरे, रत्नमाला उंदिरवाडे,वर्षा वानखेड़े, रीना रामटेके, पुरुषोतम भोयर, राजु, प्रशिक टेम्भूर्णे ,सतीश टखराल, मुकेश पिंपलकर, अंकुश डोरलीकर,अतुल साखरे,सुदाकर वानखेड़े, सुनील उदिरवाडे,बादल रामटेके, रमेश भोयर,प्रशिक भोयर,सुनील डवले,चंदू उंदिरवाडे,सिद्धांत रामटेके, वामन उंन्दिरवाडे, शुभम रामटेके,गुरुदास खोबरागड़े, गिरधर रामटेके यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सांगता राजेश शेडमाके यांनी आपल्या विशिष्ट शैलीने करून सर्वांचे मन जिंकले.














