लगातार 36 वर्ष पूर्ण
ब्रम्हपुरी..
रविंद्र मैंद
तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज
ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी येथील प्रा.मंजुषा बजाज यांनी मागील पस्तीस वर्षापासून वृक्षा रोपणाचा कार्यक्रम सातत्याने राबवत आहेत. वृक्षारोपणाचे त्यांचे हे छतीस 36 वे वर्ष आहे. सन 1980 साली शारदा कॉलनी येथे राहायला आले असतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे ह्या शारदा कॉलनी परिसरात सावलीसाठी एकहि वृक्ष नव्हते तेव्हा त्यांनी मनात नीचय केला व वृक्ष रोपणाला सुरवात केली.अनेक प्रयत्ना नंतर लोकांना देखील वृक्ष रोपणाचे महत्त्व समजायला लागले व लोकांनी साथ देने सुरू केले.त्यामुळे आज शारदा कॉलनी,संपूर्ण गांधीनगर ,ग्रामीण रुग्णालय,कब्रस्तान ,वखार महामंडळ,वडसा रोड, काहाली रोड,इत्यादी परिसरात जवळजवळ 550 वृक्ष डौलाने उभे आहेत.व संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे.आजही मनाला आनंद होत आहे.या घडीला नागरिकही जागृत झाले आहेत व झाडांच्या सावर्धनात साथ देत आहेत.दरवर्षी 6 जुलाईला गांधीनगर येथील हनुमान मंदिर परिसर व रोड लागत झाडे लावण्यात आली असून सभोवताल लोखंडी कठडे लावण्यात आलीत.
या प्रसंगी ब्रम्हपुरी ब्लास्ट चे संपादक नेताजी मेश्राम ,प्रा.उमेश मिश्रा,प्रा.विनोद नरड ,प्रा.सुभाष बजाज,प्रमोद रामटेके,प्रमोद चांदेकर,इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.या प्रसंगी वृक्ष रोपणाचा आनंद घेतला.प्रा.बजाज दप्त्यानी योगदानाबद्दल सर्वांचे आभार मानले.

