prabodhini news logo
Home अमरावती पूर्णानगर या गावातील ग्रामपंचायतीचे पोळा परिसरात दुर्लक्ष

पूर्णानगर या गावातील ग्रामपंचायतीचे पोळा परिसरात दुर्लक्ष

0
451

अमरावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – पूर्णानगर येथील पोळा परिसर येथून वाहत असलेला नाल्याची मागील काही वर्षांपासून साफ सफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. त्यामधून वाहत असलेले गावातील सांडपाणी पूर्ण रस्त्यावरून वाहत आहे व पावसामुळे तेच पाणी लोकांच्या घरातही शिरत आहे. सध्या अमरावती जिल्ह्यात डेंगू सारख्या भयंकर आजाराचे पेशन्ट वाढताना दिसत आहे. त्यामुळे या सांड पाण्यामुळे अनेक लोकांना अनेक आजाराची लागण होण्याची अधिकाधिक शक्यता नाकारता येत नाही. नाल्यातुन वाहणारे दूषित सांडपाणी वरच्या पावसामुळे लोकांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे अनेक आजाराची लागण होण्याची शक्यता आहे परंतु अद्यापही पुर्णानगर ग्रामपंचायत या पोळा परिसरा कडे दुर्लक्ष करत आहेत. गावातील काही नागरिकांनी ग्रामपंचायत कडे तक्रार करूनही त्यावर उपाय योजना होतांना दिसत नाही. गावातील नागरीक या रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत. यावर तात्काळ उपाययोजना कराव्या अन्यथा गावातील वृद्ध व चिमुकल्या मुलांना आजार होण्याची दाट शक्यता आहे व असे झाल्यास मग याला जबाबदार कोण असा सवाल ही गावातील नागरिक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here