prabodhini news logo
Home ठळक बातम्या खासदार प्रतिभा बाळुभाऊ धानोरकर यांची निर्मल अर्बन बँकेला सदिच्छा भेट

खासदार प्रतिभा बाळुभाऊ धानोरकर यांची निर्मल अर्बन बँकेला सदिच्छा भेट

0
106

नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निर्मल अर्बन बँकेच्या नागपूर येथील नंदनवन स्थित मुख्य कार्यालयास भेट दिली.यावेळी बँकेच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान खासदार धानोकर यांनी बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना/उपक्रमा संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली. आणि मानमोडे यांनी बँकेच्या माध्यमातून वर्षभर सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमासह महिला सक्षमीकरणासाठी करीत असलेल्या कामांची माहिती दिली. मा. खासदार धानोरकर यांनी बँकेच्या एकूणच प्रगतीबाबत आणिकामगिरी बद्दल कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नागपूर शहर सरचिटणीस मंदाताई बोबडे, वॉर्ड अध्यक्ष अंजली ठाकरे, काँग्रेस पदाधिकारी संगीता ठाकरे, वैशाली इंगोले, निम॔ल बँकेचे उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक तुकाराम चव्हाण, डायरेक्टर निर्मला मानमोडे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. मोहन चव्हाण, बाबाराव भिकाजी पवार (आर एफ ओ यवतमाळ), मोतीराम रामजी आडे (आरएफओ यवतमाळ), मानमोडे परिवार, निर्मल बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here