उमरी तालुक्यातील भारत फायनन्स कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून गोरगरीब महिलांची फसवणूक

0
263

भारत फायनान्सच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करा – शेख आरीफ निमटेककर.

उमरी प्रतीनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – उमरी तालुक्यातील भारत फायनन्सचे अधिकारी व कर्मचारी दलालांना हाताशी धरून गोरगरीब महिलांची फसवणूक करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत असल्याचे आरोप झुंजार क्रांती सेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख शेख आरीफ निमटेककर यांनी तहसीलदार साहेब यांना निवेदन देवून केले आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून सामान्य गोरगरीब महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे सविस्तर वृत्त असे की उमरी तालुक्यातील संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणात भारत फायनान्सचे महिलांचे बचतगट आहेत सदर कर्मचारी हे दिलेल्या फायनान्सची रक्कम वसुली करण्यासाठी दर आठवड्याला गावा गावात जातात आणि वसुली करुन घेतात परंतु सध्या भारत फायनान्सचे कर्मचारी हे महिलांना कोणतीही पूर्वकल्पना न देता यांचे नावे हप्ते व कर्ज चालू असतांना सुध्दा गावातील लालसी दलालांना हाताशी धरून दोघांनी संगणमत करून त्या गोरगरीब महिलांना भुलथापा देऊन तिचे थ्मस घेऊन दुसरे कर्ज प्रकरण मंजूर करून घेवून तुमच्या खात्याला एक हजार रुपये विमा आला, किंवा तुमचे अगोदरचे पैसे आलेले आहेत ते तुम्ही काढून घ्या नाहीतर तुम्हाला दूसरे लोन मिळणार नाही असे सांगून कर्मचारी किंवा दलालांच्या ओळखीच्या सि.एस.पी. केंद्रांवर किंवा तालुक्याच्या शाखेत त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्याचा अंगठा घेवून त्यांच्या खात्यातून पैसे परस्पर काढून घेवून त्या महिलांना सांगीतल्या प्रमाणे एक हजार रुपये देऊन पाठवुन देतात यामध्ये सि एस पी केंद्र चालक पण त्या महिलांना सांगत नाही की तुमच्या खात्यात एवढी रक्कम आहे म्हणून सांगत नाही कर्मचारी,दलाल आणि अधिकारी यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार भारत फायनान्स कंपनीचे अधिकारी व कर्मचारी हे बिनधास्त पणे करत असल्याचे आरोप झूंजार क्रांती सेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख शेख आरीफ निमटेककर यांनी केले आहे.या भारत फायनन्सच्या कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी, दलालांची अफारातफर एखाद्या महिलेला कळाल्यास ती महिला उघड करण्याचा प्रयत्न केल्यास त्या महिलेला कर्मचारी व दलाला मार्फत तीला धमकी दिल्या जाते तुला कोणतेही कर्ज मिळू देणार नाही तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे सिब्बील खराब करू तुझे नाव काळ्या यादीत टाकुन देऊ अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात यामुळे महिला समोर येऊन तक्रार करण्यासाठी घाबरतात विनाकारण नाहक त्रास सहन करत आहेत.त्यामुळे माननीय तहसीलदार साहेबांनी या सर्व प्रकरणाची कसुन चौकशी करून दोषीं व्यक्तींवर कारवाई करुन गोरगरीब महिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली यावेळी झुंजार क्रांती सेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख शेख आरीफ निमटेककर, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनचे मराठवाडा अध्यक्ष उद्धव मामडे, दैनिक लोकमचं क्रांतीचे तालुका प्रतिनिधी पिराजी कराडे, अखिल भारतीय एल्गार सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष साईनाथ गुजरवाड,लोकस्वराज्य आंदोलनचे तालुकाध्यक्ष गंगाधर गायकवाड व धाडस सामाजिक संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सदाशिव बोईनवाड सह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here